---Advertisement---
हवामान जळगाव जिल्हा

Weather Update : मार्च एंडिंगला जळगावकरांना बसणार उष्णतेच्या लाटेचा फटका

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जळगावकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. होळीनंतर आलेल्या उष्णतेच्या लाटेने पारा ४० अंशाच्या पुढे गेला होता. आयएमडीने रविवारी नवीन अलर्ट जारी केला असून मार्च एंडिंगला २९ ते ३१ दरम्यान उष्णतेची लाट येणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचे सुचविण्यात आले आहे.

heat wave unhala

उन्हाळ्याला सुरुवात झाली असून यंदा उष्णता सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. गेल्याच आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे पारा ४० अंशाच्या पुढे गेला होता. दरम्यान त्यानंतर अचानक वातावरण बदलून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. गेल्या दोन दिवसापासून पारा ४० च्या जवळपास असला तरी उकाडा मात्र कमी झालेला नाही.

---Advertisement---

भारतीय वेध शाळा (IMD) ने रविवारी नवीन अलर्ट जारी केला आहे. रविवारी आणि सोमवारी तापमान स्थिर राहणार असले तरी दि.२९ ते ३१ दरम्यान उष्णतेची लाट परतणार आहे. भारतीय वेधशाळेने दिलेला इशारा लक्षात घेता नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---