⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार; उद्यासाठी जळगावला ऑरेंज अलर्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२१ । येत्या ४८ तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात बहुतेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तविली आहे. हवामान विभागानं उद्यासाठी 5 सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली, लातूर नांदोड, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

5 सप्टेंबरला या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट
हवामान विभागानं उद्यासाठी 5 सप्टेंबरला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

6 सप्टेंबर 
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, नागपूर. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

7 सप्टेंबर 
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, औऱंगाबाद, बीड, परबणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.