जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२४ । गेल्या काही दिवसापासून तापमान वाढीने उकाडा वाढला होता. यामुळे जळगावकर हैराण झालेहोते. मात्र ऊन-सावलीसह वाऱ्यामुळे मंगळवारी तापमानाच्या तडाख्यापासून जळगावकरांना दिलासा मिळाला. दरम्यान हवामान खात्याने जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविली असून असून यात तापमानाचा पारा ३८ अंशाखाली राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्यात काल अचानक दुपारच्या वेळेस ढगाळ वातावरण झाले. वाऱ्यासह ऊन सावलीमुळे दिवसा जाणवणाऱ्या चटक्यांपासून दिलासा मिळाला.यावेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने सायंकाळी थंडावा निर्माण झाला.मात्र या पावसामुळे मका, बाजरी ज्वारी काढणीला आलेले अनेक पीक जमीन दोस्त झाले. बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात दि.११ व १२ रोजी पावसाची शक्यता असून आगामी पाच दिवसात तापमानाचा पारा ३८ अंशाखाली राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी ने व्यक्त केला आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे पारा किंचित घसरल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.
काय आहे अंदाज?
दि.१०-दुपारी व सायंकाळी ढगाळ वातावरण
दि.११-विजांचा कडकडाटासह पाऊस
दि.१२-विजांचा कडकडाटासह पाऊस
दि.१३-अंशतः ढगाळ आकाश
दि.१४-अंशतः उगाळ आकाश
दि.२५-अंशतः ढगाळ आकाश निर्माण झाला,