---Advertisement---
जळगाव जिल्हा

We… The Jalgaon Police : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या अधिकाऱ्यांचा स्टायलिश लूक पाहिला का!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी कायम असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आपण कायम खाकीमध्ये वावरताना पहिले आहे. नुकतेच पार पडलेल्या पोलीस वेलफेअर विभाग आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सर्व अधिकारी सूट, बुटात आले होते. सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना एक स्टायलिश फोटो अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी ट्विट केला आहे.

Jalgaon Police

जिल्ह्यातील पोलीस प्रशासनातील प्रमुख अधिकारी वर्ग सहजासहजी खाकी शिवाय पाहायला मिळत नाही, त्यातल्या त्यात सूट, बूट घालून स्टायलिश अंदाज तर क्वचितच नजरेस पडतो. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा एक फोटो नुकतेच समोर आला आहे. जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गेल्या महिन्यात पोलीस वेलफेअर अंतर्गत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे आणि प्रसिद्ध टीव्ही शो ‘चला हवा येऊ द्या’ फेम टीम जळगावात आली होती. पोलीस मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

---Advertisement---

दोन वर्षानंतर पार पडलेला कार्यक्रम सुपरहिट झाल्याने सर्व खुश होते. कार्यक्रमाच्या नियोजनात आणि मान्यवरांच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा एक फोटो अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी ट्विट केला असून छानसे कॅप्शन देखील दिले आहे. फोटोमध्ये जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, सहाय्यक अधीक्षक अशीत कांबळे, डीवायएसपी संदीप गावीत आणि डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे दिसत आहे.

चंद्रकांत गवळी यांचे ट्विट

रुबाबदार आणि एकाच जोशात मार्गक्रमण करीत असलेल्या या अधिकाऱ्यांनी आजवर जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तर अबाधित राखलीच आहे, यापुढे देखील ते कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे. खाकी प्राईड (खाकीचा अभिमान) दर्शविणारा हा फोटो अनेकांना आकर्षित करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---