जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बहिणींच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी याविरुद्ध आक्रमक झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांच्यासह महिलांनी आयकर विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. भाजपचे आयकर कार्यालय असा फलक झळकवत ‘आम्ही देखील अजितदादांच्या भगिनी असून आमच्यावर आयकरच्या धाडी टाका’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासह त्यांच्या बहीणींच्या कार्यालयांवरही आयकर विभागाने धाडी टाकल्या. अजित पवारांच्या मालमत्तांची चौकशी होणे आम्ही समजु शकतो, त्यातुन सत्य काय ते बाहेर येईलच परंतु कुटुंब म्हणुन त्यांच्या बहीणींना त्रास देण हा राजकीय हतबलतेचाच एक भाग आहे. हे सुडाच राजकारण नैतिकतेला व वैचारीकतेला धरून नाही. अजितपवारांच्या कुटुंबावर या धाडी टाकुन आयकर विभाग भाजपच्या दबावाला बळी पडतो आहे असेच यातुन दिसते. म्हणुन आज आम्ही याचा निषेध करतो आणि त्या जशा अजित पवारांच्या बहीणी आहेत तसेच राष्ट्रवादी हे सुध्दा एक कुटुंब आहे आणि आम्हीही त्या कुटुंबातल्या बहीणी आहोत म्हणुन आयकर विभागाने आमच्यावरही धाडी टाकाव्या, अशी विनंती त्यांनी निवेदनात केली आहे.
आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील, अर्बन सेल अध्यक्षा अश्विनी देशमुख, युवती जिल्हाध्यक्ष कल्याणी राजपूत, सरचिटणीस स्नेहल शिरसाठ, प्रतिभा शिरसाठ, मुविकोराज कोल्हे, जुबेर खाटीक, प्रवीण महाजन आदींनी सहभाग नोंदविला.
पहा आंदोलनाचा व्हिडीओ :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/610196193363172/