जळगाव लाईव्ह न्युज । गोपाळ भारुडे । यावल तालुक्यातील चितोडा गावी पाण्याची समस्या भेडसावत आहे. उन्हाळा सुरू असून त्यात गावात पाण्याची तर भीषण टंचाई जाणवतं आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही समस्या अद्यापही ग्रामपंचायत कडून दूर करण्यात आलेली नाही. यामुळे गावकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
दरम्यान गावातील माजी सरपंच तथा ग्रा.पं.सदस्य कडू पाटील यांनी त्यांच्या फलाट मधून गावातील झोपडपट्टी भागात नळाद्वारे पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागातील राहिवाश्यांना याचा दिलासा मिळाला आहे. तसेच गावातील माजी सदस्य यांच्या शेतामधून तात्पुरती गावात पाणी आणले जात असल्याचे समजतंय. मात्र कायम पाण्याची व्यवस्था कधी होणार असे गावकाऱ्यांकडून बोललं जातेय.
गावात पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. हे लक्ष्यात घेऊन गावातील ग्रामपंचायत सदस्य कडू पाटील यांनी स्वतःत च्या फलाटमधील पाणी संवेदनशील अशा झोपडपट्टी भागात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या कामगिरी बद्दल कौतुक होत असून त्यांच्या या निर्णयामुळे काहीसा का होईना पाण्याचा थोडासा प्रश्न मिटला आहे. मात्र ग्रामपंचायकडून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न कधी मिटेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या गावात पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी तात्पुरता ग्रामपंचायत माजी सदस्य डिगंबर महाजन यांच्या शेतामधून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामी ग्रामपंचायत कडून पाइप लाईनचा खर्च केला जात.