⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावकरांसाठी चिंतेची बातमी? गिरणा धरणात पाण्याचा ओघ मंदावला, सद्यस्थितीचा जलसाठा किती?

जळगावकरांसाठी चिंतेची बातमी? गिरणा धरणात पाण्याचा ओघ मंदावला, सद्यस्थितीचा जलसाठा किती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२४ । पावसाळ्याचे अडीच महिने उलटले तरी देखील गिरणा धरण निम्मेसुध्दा भरलेले नसल्याने शेतकरी वर्गासह निम्म्या जळगाव जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. गिरणा धरणात पाण्याचा ओघ मंदावला असून सद्यस्थितीत धरणात ४३.४१ टक्के एवढा जलसाठा आहे.

यंदा पावसाळ्यातील पहिली तीन नक्षत्रे संपल्यानंतरही गिरणा धरणात पाण्याची अजिबात आवक नव्हती. जलसाठा ११.७५ टक्क्यांवरच स्थिरावलेला होता; मात्र गिरणेच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे ११.७२ टक्के असलेला जलसाठा गत १२ दिवसांत ४३.४१ टक्के झाला आहे. तरी येणाऱ्या पाण्याचा ओघ आता मंदावला आहे.या जलसाठ्यामुळे पेयजलाची समस्या सुटणार असली तरी, गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही शेतीसिंचनाची परवड होईल का? याप्रश्नाने शेतकरी धास्तावले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील १८२ हून अधिक पाणीपुरवठा योजनांसह चाळीसगाव शहर, मालेगाव तसेच नांदगाव शहराला गिरणा धरणातून पाणीपुरवठा होतो. मालेगाव व चाळीसगाव औद्योगिक वसाहतीची चाकेही गिरणा धरणाच्या जलधारेवर फिरतात. गेल्यावर्षी हे धरण जेमतेम ५३ टक्केच भरले होते. याचा थेट फटका शेती क्षेत्राला बसला. गेल्यावर्षी गिरणातील जलसाठा पेयजलासाठीच आरक्षित केला गेला. शेतीसिंचनासाठी आवर्तन मिळू शकले नाही. पेयजलासाठी देखील सहाऐवजी चारच आवर्तने दिली गेली

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.