---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र

गणपतीनगरसह पिंप्राळ्यात पाणी टंचाई ; नागरीकांना बघावी लागतेय पाण्याची वाट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२३ । शहरातील पिंप्राळा परिसरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून नागरिकांना पाण्याची वाट बघावी लागत आहे. गणपती नगरात गेल्या दोन दिवसांपासून पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी पुरवठा होवु शकलेला नाही. मात्र तरीही पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना त्याचा काहीच फरक पडत नसल्याचे दिसून आले.

mnpa vasuli jpg webp

पिंप्राळा परिसरातील मुक्ताईनगर, बीएसएनएल टॉवर परिसर, आसाराम बापू आश्रम समोरील परिसर, आर.एल हॉस्पिटल परिसर, सावखेडा रोड परिसर, गणपती नगर, माधव नगर, सुख अमृत नगर, साई कल्पना रेसीडेंन्सी, सोनी नगर, ओंकार पार्क, जाखेटे नगर परिसरात गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांकडून होत असतांना मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून त्याकडे दुलर्क्ष केले जात आहे.

---Advertisement---

परिसरातील नागरिक सोमवारी नगरसेवक मयुर कापसे व नगरसेवक पुत्र अतुल बारी यांना घेवून पिंप्राळ्यातील दांडेकर नगर पाण्याच्या टाकीजवळील कार्यालयात गेले होते. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या इंजिनियर रंधे यांना सांगितल्या तसेच समस्यांचे निवेदन रंधे यांना दिले. परंतु त्यांनी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

गणपती नगर परिसरात असलेल्या साई कल्पना रेसिडेन्सी येथे शनिवारी पाईपलाईन फुटली होती. रविवारी या भागात पाणी पुरवठा होणार असल्यामुळे सदर पाईपलाईन शनिवारी तातडीने जोडणे आवश्यक होते. परंतु पाणी पुरवठा विभागाने शनिवारी पाईपलाईन जोडली नाही, त्यामुळे रविवारी होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. तसेच रविवारी देखील दिवसभर ती पाईपलाईन न जोडल्यामुळे सोमवारी देखील दिवसभर पाणी पुरवठा न झाल्यामुळे नागरिक चांगलेच संतापले होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---