⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | बातम्या | सत्यमेव जयते समृद्धी फार्मर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणाला सुरुवात

सत्यमेव जयते समृद्धी फार्मर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणाला सुरुवात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । पाणी फाउंडेशन ‘च्या’ माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील अमळनेर, जामनेर, नंदुरबार, शहादा, मोताळा या समृद्ध गाव स्पर्धेत ५ तालुक्यातील बंधू-भगिनींचा प्रशिक्षणाची जळगाव येथील आर्यन रिसॉर्ट सेंटर येथे सुरुवात झाली आहे.

पाणी फाउंडेशन ‘च्या’ वॉटर कप स्पर्धा उत्तर महाराष्ट्रात 2018 पासून सुरुवात झाली. उत्तर महाराष्ट्रातील गावांनी या स्पर्धेत दुष्काळ निर्मितीसाठी खूप मोठ्या प्रमाणात 18 व 19 साली सहभाग घेतला. शेकडो गावकऱ्यांनी पाणी फाउंडेशन च्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेकडो गावे पाणीदार बनवले व दुष्काळ मुक्तीकडे पाऊल टाकले. पाणी फाउंडेशन या गावकऱ्यांच्या व जलमित्रांच्या एकीतून निर्माण केलेल्या पाण्याचे आर्थिक समृद्धीत रूपांतर करण्यासाठी 2020 साली समृद्ध गाव स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेमध्ये जल व मृदा संधारण कामे करणे, पीक नियोजन, जल व्यवस्थापन, संरक्षित करून क्षेत्र निर्माण करणे, वृक्ष व जंगलाची वाढ करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ करणे या घटकांवरती सत्यमेव जयते समृद्धगाव स्पर्धेचे काम 2020, 21 साली टप्पा 1 व टप्पा 2 मध्ये पाच घटकांवरती केले केले.

या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील 900 गावांपैकी 700 गावांनी कोरोनाच्या वैश्विक महामारी मध्येसुद्धा उत्कृष्ट काम केले. या कालावधीमध्ये कोरोना या वैश्विक महामाराचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्व लोकांना एकत्रित होण्याची संधी मिळत असताना पाणी फाऊंडेशन पुन्हा एकदा “मिशन बिगीन अगेन” करिता पाणी फाऊंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेमध्ये गावकर यांनी निर्माण केलेल्या पाण्याचे आर्थिक समृद्धीत रूपांतर करण्याकरिता सत्यमेव जयते समृद्धी फार्मर कप स्पर्धा घेण्याचे नियोजन केले. शेकडो गावांमध्ये सभा ऑनलाईन मीटिंग व गावकरी यांच्या भेटी घेवून फार्मर कप बद्दल शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवली. पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावकर यांनी निर्माण केलेल्या पाण्याचे आर्थिक समृद्धीत रूपांतर करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील समृद्धगाव स्पर्धेतील गावातील पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षनार्थी शेतकरी बांधवांना जळगाव येथील आर्यन इको रिसॉर्ट या ठिकाणी प्रशिक्षणाची सुरुवात झाली.

प्रशिक्षण तीन टप्प्याने

समस्या सोडवण्यासाठी शेतकरी पिकांचे गट निर्मीती, गट शेतीच्या माध्यमातून एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीने सोडवू शकतो, गावांमध्ये गटांची निर्मिती करून fpo कडे कशी वाटचाल करायची, fpc ची कशी निर्मीती करायची, पिकांची पूर्वमशिगतिपासून ते काढणी पर्यतचे ज्ञान व त्या स्टॅटर्ड ऍपरेटिग पद्धती कशा पद्धतीने करायच्या या सर्व पद्धतीचे ज्ञान पाणी फाऊंडेशनचे मास्टर, ट्रेनर, तांत्रिक प्रशिक्षक, सामिजिक प्रशिक्षक ज्ञान फिल्म, खेळ, या देणार सत्राच्या माध्यमातून दिले आहेत. प्रशिक्षण तीन दिवसा टप्प्या टप्प्याने दिले जाणार तसेच प्रशिक्षण घेतल्यानंतर देखील शेतकरी बंधूंना वेगवेगळ्या पिकांच्या बनवलेल्या गट यांना पूर्व मशागतीपासून ते पीक काढून विक्री करेपर्यत च्या सर्व पद्धतीने तांत्रिक ज्ञान कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ व तज्ञ व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या कार्यशाळा यांच्या माध्यमात दिली जाणार आहे. या स्पर्धे मध्ये काम करणाऱ्या गटांना समृद्ध गाव स्पर्धेच्या मूल्यांकनाच्या आधरीत काम केले तर ती राज्यस्तरावर प्रथम 2500000, द्वितीय 1500000 व तृतीय बक्षीस 1000000 व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गटाला 100000रुपये असे बक्षीस पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून दिले जाणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह