अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी वेगाने काम करणार: वसीम खान

मे 11, 2026 10:52 AM

वसीम खान यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

vasim

जळगाव लाईव्ह न्यूज । शांतता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या एका ऐतिहासिक घटनेची जळगाव शहरात नोंद झाली आहे. दंगलग्रस्त कॉलनी भागात भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच वसीम खान यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र व भव्य सन्मान स्मरणिका प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे स्थानिक अल्पसंख्याक बांधवांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमात बोलताना आमदार राजू मामा भोळे म्हणाले, “दंगलग्रस्त कॉलनीचे हे नवे नाव ‘अब्दुल कलाम नगर’ असेल. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आदर्शाने या भागाला नवसंजन मिळेल. भाजप सर्व समाज जोडणारा पक्ष आहे!” या घोषणेवर उपस्थित मुस्लिम बांधवांनी दिगंबर उड्याही काढल्या.

या प्रसंगी अनेक मुस्लिम बांधवांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. अल्पसंख्यांक मोर्च्याच्या या उपक्रमाने सामाजिक सलोखा वाढवण्याचे मोठे उदाहरण निर्माण झाले आहे. वसीम खान म्हणाले, “भाजपाच्या या व्यासपीठावरून अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी आणखी वेगाने काम करणार!”

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now