जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । ११ आणि १२ जून या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे मराठवाड्यातील औरंगाबाद सह अन्य जिल्ह्यात जोरदार मेघगर्जनेसह ताशी ३० ते ४० कि.मी. वेगवान वाऱ्या-विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. नागरिकांनी या काळात सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे
जिल्ह्यात आगामी तीन-चार दिवसात १४ जून दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने काही तुरळक ठिकाणी हजेरी लावली असून शनिवार ११ जून ते १४ जून दरम्यान कोकण विभागासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार मेघगर्जनेसह ताशी ३० ते ४० कि.मी. वेगवान वाऱ्या-विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात देखील गेल्या दोन दिवसापासून मान्सूनच्या पावसास सुरुवात झाली असून चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, यावल रावेर परिसरात मान्सूनच्या सुरुवातीलाच जोरदार पावसासह वादळ वाऱ्यामुळे बागायती शेतपिकांसह नागरिकांचे नुकसान झाले आहे.
११ आणि १२ जून या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे मराठवाड्यातील औरंगाबाद सह अन्य जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी जोरदार मेघगर्जनेसह ताशी ३० ते ४० कि.मी. वेगवान वाऱ्या-विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. नागरिकांनी या काळात सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे