सावधान : व्हॉटसअॅपच्या बनावट आवृत्तीपासून स्वतःचा करा बचाव अन्यथा….
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । व्हॉटसअॅप या आपल्या सर्वांच्या जिवलग कंपनीने सर्वांना सावधानतेचा इशारा दिला आहे. यावेळी कंपनीने सर्व ग्राहकांना मेसेजिंग अॅपच्या बनावट आवृत्त्यांपासून सावध राहण्याचा कडक इशारा दिला आहे. विल कॅथकार्ट यांनी ट्वीट करत व्हॉट्सअॅपची सुधारित आवृत्ती न वापरण्याची विनंती केली आहे.
अधिक माहिती अशी कि, व्हॉटसअॅप कंपनीच्या सिक्युरिटी रिसर्च टीमला काही बनावट अॅप सापडले आहेत. “HeyMods” नावाच्या डेव्हलपरचे “Hey WhatsApp” सारखे अॅप धोकादायक आहेत आणि लोकांनी ते डाउनलोड करणे टाळावे असे कंपनीने सांगितले आहे. कारण यामुळे नागरिकांना धोका होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
Good post: using a modded WhatsApp version is never a solution for your privacy and security.
— WABetaInfo (@WABetaInfo) July 12, 2020
Download the latest public release for Android: https://t.co/TzvR1dJz9y pic.twitter.com/rERxMlTQgx
व्हॉटसअॅपच्या सुधारित किंवा बनावट आवृत्त्या व्हॉटसअॅपसारखीच सेवा देतात. पण व्हॉटसअॅपची मूळ आवृत्ती तुमच्या व्यक्तिक माहितीचे संरक्षण करते. मात्र, हे व्हॉटसअॅप सारखे अॅप तुमच्या व्यक्तीक माहितीचे संरक्षण करण्यापेक्षा त्याचा गैरवापर करु शकते अशी भीती व्हॉटसअॅपचे सीईओ विल कॅथकार्ट यांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता नागरीकांनी शांत राहणे गरजेचे आहे.