⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मोफत हदयरोग तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२४ । डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात मा. ना गिरीष महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत हदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.आज डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. निखिल कलासरे यांच्या उपस्थीतीत या शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जवळपास १०० च्या वर रूग्ण उपस्थीत होते.

प्रारंभी रूग्णांची तपासणी केल्यानंतर आवश्यकता असणा—या रूग्णांची इसीजी व टु.डी इको तपासणी देखिल मोफत करण्यात आली. यातून ज्या रूग्णांना हदयाचा त्रास नव्हता अशा रूग्णांना भविष्यात हा धोका टाळण्यासाठी हदयरोग तज्ञांनी मार्गदर्शन केले. यातील १५ रूग्णांना तातडीच्या उपचाराची गरज असल्याने एन्जीओग्राफी व एन्जीओप्लास्टीचा सल्‍ला देण्यात आला आहे. ५ रूग्णांना दाखल करण्यात आले असून लवकरच त्यांची एन्जीओग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याचबरोबर जिल्हयातील विविध ठीकाणी देखिल शिबिराच्या माध्यमातून देखिल जवळपास २५० च्या वर रूग्णांची इसीजी व टु.डी इको तपासणी करण्यात आली असून यातील ३७ रूग्णांना पुढील उपचारार्थ लवकरच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. हे शिबिर २५ मे पर्यंत सूरू राहणार असल्याचे देखिल प्रशासनाने सांगितले असून जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बर्‍याच रुग्णांमध्ये शरीर हे भरपूर प्रमाणात धोक्याच्या सूचना देत असते. सामान्यपणे, हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच ही लक्षणे उद्भवलेली असतात. तुम्ही फक्त ही लक्षणे व्यवस्थितपणे ओळखण्या मध्ये सक्षम असणे हे प्रतिबंधात्मक पावले उचलण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. ंर् निद्रानाश,थकवा, श्वास घेण्यामध्ये समस्या, छातीमध्ये वेदना, पोटामध्ये वेदना, असामान्यपणे घाम येणे इ. हृदय विकाराच्या झटक्या पुर्वी येणारी ही काही धोक्याची लक्षणे आहेत. वरील पैकी कोणतेही लक्षण जाणवत असल्यास शिबिरात नक्‍की तपासणी करून घ्यावी. डॉ.निखिल कलासरे हदयरोग तज्ञ.