⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मातृप्रेम : आईचा १००वा वाढदिवस या पठ्याने असा केला साजरा

जळगाव लाईव्ह न्युज | सुभाष धाडे | आईच्या शंभराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंढरपुरला आषाढी एकादशीच्या वारीवर पोहचलेल्या एका शेतकरी भाविकाने चक्क पन्नास हजाराची मदत वारकऱ्यांना अन्नदानासाठी पंढरपुरातील मुक्ताई मठात केली.

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील बनाबाई सांडु पाटील या आजीबाईंनी आज वयाची शंभरी गाठली.मलकापुर तालुक्यातील दसरखेड येथील माहेर असलेल्या आजीबाईचा जन्म ११ जुलै १९२२ मध्ये झाला. सहा मुली व पाच मुलांसह नातवंडं सुनासह परीवार आहे. आजीबाईंनी शंभरी पार करूनही आजीबाईचे आरोग्य आजही निरोगी अवस्थेत असुन त्या तंदुरुस्त आहेत. त्यांचे सुपुत्र सुकळी परीसरातील केळी उत्पादक शेतकरी डिगंबर सांडु पाटील यांनी आषाढी वारीनिमित्त पंढरपुर येथे गावातील भाविकांसह होते.

दरवर्षी आषाढी एकादशीचा उपवास सोडायच्या दिवशी सुकळी येथील भाविकांतर्फे मुक्ताई मठात अन्नदानाचा उपक्रम होत असतो. पंचक्रोशीतील भाविकांसह जिल्ह्यातील भाविक या मठात महाप्रसादाचा लाभ घेत असतात.जिल्ह्यातील दरदिवशी येथील मुक्ताई मठात दानशुर व्यक्तींकडुन भोजन व्यलस्था करण्यात येते.आषाढी च्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारसला सुकळी येथील ग्रामस्थांकडुन भोजन व्यवस्था केलेली असते.अशातच डिगंबर पाटील यांनी आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सुमारे पन्नास हजार रुपयाची मदत अन्नछत्रास उपलब्ध करुन असंख्य वारकऱ्याना भोजन व्यवस्था करुन जेवू घातले.त्यांच्या या देणगी कार्याबाबत अनेकांनी कौतुक केले. प्रसंगी पंडीतराव पाटील, महारु चव्हाण, अनिल डापके, संतोष पाटील, गजानन पाटील, शिवाजी पाटील, अनंतराव पाटील यांच्यासह भाविकांनी सहकार्य केले.