⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | वीज बिलावर सवलत हवी आहे? तर नक्की वाचा हि बातमी ; तुमचा होईल ‘बंपर फायदा’ !

वीज बिलावर सवलत हवी आहे? तर नक्की वाचा हि बातमी ; तुमचा होईल ‘बंपर फायदा’ !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । वीजबिलात मिळणारी सवलत आणि बिल भरणा केंद्रावर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने ग्राहकांनी वीजबिल ऑनलाईन भरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. एप्रिल महिन्यात जळगाव परिमंडलातील तीन लाखांहून अधिक ग्राहकांनी 62 कोटी रुपयांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे. discount on electricity bill

महावितरणने www.mahadiscom.in या वेबसाईटवर ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेसह मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्यासाठी व भरण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह विविध मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वीजबिल ऑनलाईन भरण्यास ग्राहक पसंती देत आहेत. त्यामुळे त्यांचे बिल भरणा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे.

बिलात 0.25 टक्के सूट

ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट सुलभतेने करता यावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास सेवा नि:शुल्क आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास वीजबिलात 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सवलत मिळते.

If you pay online, you get 0.25 percent discount on electricity bill up to a limit of Rs 500.




तात्काळ मिळते पोच

वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

‘गो-ग्रीन’द्वारे वर्षाला 120 रुपये वाचवा

महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी ‘गो-ग्रीन’ योजनेत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा 10 रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह