---Advertisement---
बोदवड

बोदवड नगरपालिकेसाठी २१ डिसेंबरला मतदान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । बोदवड नगरपालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून १७ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छूकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

Election 1 jpg webp

बोदवड नगरपंचायतीची स्थापना १ मे २०१६ रोजी करण्यात आली होती. स्थापनेनंतर नगरपालिकेचा पहिला पंचवार्षिक कार्यकाळ दि.२२ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून २९ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील त्यानंतर ३० राेजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. १ ते ७ डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी व वैध उमेदवारांची यादी ८ राेजी प्रसिद्धी हाेईल. १३ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. २१ डिसेंबरला मतदान आणि २२ डिसेंबरला सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होईल.

---Advertisement---

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच १ ते १७ प्रभागातील इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. प्रभागांमधील भेटीगाठी वाढल्या आहेत. दरम्यान, प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेतल्या जात आहेत.सर्वाधिक हरकती या नावात बदल झाल्याच्या आहेत. त्यामुळे अंतिम प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढणार आहे. यंदा नगराध्यक्ष नगरसेवकांमधून निवडला जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. त्यानुसार राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---