भुसावळ

वाचनाचा गंध नसल्याने होतेय शब्दसंपत्तीत घट : बादशाह

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी वाचनापासून दूर जात आहेत. यामुळे शब्दसंपत्ती वाढत नाही. याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होतो. हे टाळून व्यक्तीमत्व अधिक समृद्ध करण्यासाठी आपण विविध पुस्तकांचे वाचन केले पाहिजे, असा सल्ला ग्राम वाचनकट्ट्याचे उदघाटन करताना ग्रामसेविका कांचन बादशाह यांनी जाडगाव येथे दिला.

विद्यापीठ आणि वरणगाव येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पुढाकारातून जाडगाव (ता.भुसावळ) येथे रासेयोच्या सहकार्याने कवयित्री बहिणाबाई ग्रामवाचन कट्टयाचे उद्घाटन ग्रामसेविका कांचन बादशहा यांच्या हस्ते फित कापून झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.के. सोनवणे हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी पुस्तके आणण्यासाठी रोख ११०० रूपयांची भेट दिली. महाविद्यालयातील डॉ. नितीन इंगळे, प्रा.विजय पवार, प्रा.अजित कळवले, डॉ.बी.जी.देशमुख, प्रा.एम.एस.पाटील, डॉ.एस.के.बच्छाव यांनी पुस्तके भेट दिली. प्रास्ताविक प्रा.अशोक चित्ते, तर आभार डॉ.एस.के.बच्छाव यांनी मानले. भूषण जोहरे, महेश सोनवणे, कोमल पाटील या स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button