⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

विठ्ठल विठ्ठल : संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाटातुन पंढरीच्या दिशेने

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..!
आणिक मी देवा काही नेणे..!
गाये नाचे उडे आपुलीया छंदे..!
मनाच्या आनंदे आवडीने…

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । अभंगवाणीचा गजर करत टाळ मृदंगाच्या तालावर माउली..माउली..हा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींची आषाढी पायीवारी पालखी सोहळा दिवेघाटातुन पुढे निघाली आहे. दोन वर्षानंतर माऊलींच्या पालखी सोहळा लाखों वारक-याच्या उपस्थित निघाला आहे. आज सकाळपासुनच दिवेघाटात हरिनामाचा गजर करत मजलदरमजल करत वारकरी पंढरीकडे निघाला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही दिवे घाटातून पुणे-सासवड- लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी ही पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती, इंदापूर, अकलूजमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. त्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आले आहे.

प्रशासनातर्फे दिवे घाट आणि बोपदेव घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. २४ ते २८ जून या कालावधीत तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये ही वाहतूक बंद राहणार आहे. माऊलींची पालखी ही २४ जुनला मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे २३ तारखेपासूनच रात्री ११ पासून २६ जून रात्री ८ पर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे वळवण्यात आली आहे. तर सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे.