जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । केसीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्पुटर इंजिनीरिंग विभागातर्फे जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड जळगाव येथे तंत्रनिकेतनाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल विझिटचे आयोजन करण्यात आले.
यात ब्रिकेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे ज्ञान दिले, तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. सदरील इंडस्ट्रियल विझिट प्रा.काजल विसराणी आणि योगेश फेंगडे यांनी आयोजित केली. ही भेट विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी खूप फायदेशीर ठरली. या विझिट दरम्यान विद्यार्थ्यांनी गांधी रिसर्च फौंडेशनलाही भेट दिली.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज