भोरगाव लेवा पंचायत विभागीय अध्यक्षपदी विष्णू भंगाळे यांची निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे येथील मुख्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी कुटुंब नायक रमेश विठू पाटील होेते. यावेळी कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. जळगाव विभागाची स्वतंत्र कार्यकारिणी निवडण्यात आली. यात विभागीय अध्यक्षपदी विष्णू भंगाळे यांची निवड करण्यात आली.
यासह विभागीय कार्यालय लेवा बोर्डिंग येथून सरदार वल्लभभाई पटेल भवनात स्थलांतरित करण्याचेही ठरवण्यात आले. कुटुंब पंचायतीपुढे येणाऱ्या तडजोडी, कौटुंबिक वादाची प्रकरणे हे आता विभागीय स्थरावरून सोडवण्यात येणार आहे. त्यानुसार कार्यकारिणीची निवड झाली.
यात कुटुंबनायक रमेश विठू पाटील व कुलसचिव ॲड.संजय एम . राणे हे कायमस्वरुपी पदसिद्ध सदस्य राहतील असेही ठरवण्यात आले. यासह जळगाव विभागीय अध्यक्षपदी विष्णू भंगाळे, उपाध्यक्ष सुनील खडके, सचिव अॅड. ज्योती भोळे, सहसचिव सचिन महाजन, सदस्य ए. बी. पाटील, मधुकर भंगाळे, डॉ. स्नेहल फेगडे, प्रदीप भोळे, मनोहर महाजन, प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, ललित चौधरी, आशा कोल्हे, डॉ. ज्योती महाजन, नीला चौधरी, डॉ. जयंती चौधरी यांची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.