⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

दहावीत कमी गुण मिळाले तर टेंशन घेवु नका ! फक्त ‘या’ लोकांना भेटा

जळगाव लाईव्ह न्यूज : ३१ मे २०२३ : महाराष्ट्र स्टेट बोर्डचा दहावीचा निकालही याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आपल्याला मोठे लोक नेहमिच सांगत असतात की चांगलं शिकून चांगले मार्क्स नाही आणलेत भविश्यात चांगली नोकरी मिळणार नाही आणि पैसे मिळणार नाहीत. यामुळे ज्या मुलांना चांगले मार्क मिळत नाही ते टेंशन घेतात. मात्र ते जे म्हणतात ते काही चुकीचं नाही. चांगली नोकरी आणि पैसे यासाठी चांगले मार्क लागतातच. अश्या वेळी जर कमी मार्क मिळाले तर टेंशन घेवू नका. कमी मार्क्स असणारे विद्यार्थीही चांगलं करिअर करू शकतात.


यासाठी फक्त काही गोष्टी करण्याची अत्यंत गरज आहे. जर कमी मार्क मीळाले तर आर्टस्मध्येही करिअरच्या अनेक संधी आहे. याबद्दल तुम्हाला माहिती नसेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या शिक्षांना भेटून त्यांच्याशी पुढील वाटचालीबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच कमी मार्क्स मिळाले असतील तर सर्वात आधी शिक्षकांना भेटणं आवश्यक आहे.

कमी मार्क्स तर काही विद्यार्थी शिक्षण सोडण्याचा निर्णयही घेतात. मात्र त्यापेक्षा तुम्ही करिअर काउन्सिलरला भेटा. काउन्सिलर तुमची एक छोटी बुद्धिमत्ता चाचणी घेऊन तुम्हाला कुठे आवड आहे हे ओळखतात आणि त्यानुसार तुम्हाला शिक्षण घेण्याचा सल्ला देतात. तुम्ही अशा काही मोठ्या ताई-दादांना भेटा ज्यांनी चांगले करिअर घडवले आहेत. त्यांचा सल्ला, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच कमी येईल