संतापजनक! पती-मुलांना जीवेठारची धमकी देत महिलेवर अत्याचार
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२४ । महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. अशातच जळगावातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. पती-मुलांना जीवेठार मारण्याची धमकी देत शेतात महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित नराधमाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात विवाहिता आल्या पती आणि मुलांसह वास्तव्याला आहे. शेती करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, २१ जुन रोजी दुपारी ३ वाजता महिला व तिचे पती शेतात काम करत होते. त्यानंतर पती हे बियाणे घेण्यासाठी व मुलांना शाळेतून आणण्यासाठी शेतातून गावात निघू गेले.
त्यावेळी त्यांच्या गावात राहणारा एकाने महिला एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच मुलगा आणि पतीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शंकर धनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे.