⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | प्रवाशांनो लक्ष्य द्या..! भुसावळहुन धावणाऱ्या या मेमू गाड्या आजपासून आठवडाभर रद्द, नेमकं कारण काय?

प्रवाशांनो लक्ष्य द्या..! भुसावळहुन धावणाऱ्या या मेमू गाड्या आजपासून आठवडाभर रद्द, नेमकं कारण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 7 मार्च 2024 | भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर यार्डातील कामामुळे ब्लॉक घेण्यात येत असून आज गुरूवार ७ ते १४ मार्च पर्यंत तब्बल आठवडाभर भुसावळ- देवळाली व भुसावळ-इगतपुरी या दोन मेमू गाड्यांसह नाशिक बडनेरा गाडी अप व डाऊन या दोन्ही बाजूंनी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत.

एकीकडे लग्नसराईचे दिवस सुरु असून यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे. यातच भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम प्रगती पथावर सुरू असून या दरम्यान चाळीसगाव रेल्वे स्थानकावर वार्ड रिमोडेलिंगच्या कामामुळे तीन मेनू गाड्यांसाठी आठवडाभराचा ब्लॉक घेण्यात आला आहे.

त्यामुळे ७ मार्च पासून गाडी क्रमांक ११११४ अप भुसावळ-देवळाली मेमू भुसावळ रेल्वे स्थानक येथून रद्द करण्यात आली आहे. तर शुक्रवार ८ रोजी पासून गाडी क्रमांक ११११३ डाऊन देवळाली-भुसावळ ही मेमू देवळालीहून रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी क्रमांक ०१२११ अप आणि ०१२१२ डाऊन बडनेरा-नाशिकरोड बडनेरा मेमू गाडी ७ रोजी पासून दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १११२० अप भुसावळ-इगतपुरी गुरूवार पासून भुसावळहून रद्द करण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.