⁠ 
रविवार, मे 5, 2024

विलास ताठे यांची भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । रावेर तालुक्यातील विलास ताठे यांची भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषद नई दिल्ली संघटनेच्या वतीने रावेर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, सचिव, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्की राजपूत यांनी मेल करून अँड देवकांत पाटील जिल्हा अध्यक्ष जळगाव यांच्या शिफारशीनुसार विलास ताठे यांची नियुक्ती करण्यात आली.

विलास ताठे हे सामाजिक कार्यकर्ते असून ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या रावेर तालुका अध्यक्ष पदी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष असून ते संभाजी ब्रिगेड रावेर माजी तालुकाध्यक्ष सुध्दा होते. अशा प्रमुख पदांवर व रावेर तालुका स्तरावर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय , फुले शाहू आंबेडकर चळवळीचे पुरस्कर्ते आहेत.

अशा प्रमुख संघटना, पदांची जबाबदारी ते चोखंदळ पणे नेहमीच पार पडत असतात, तसेच निवड झाल्याबद्दल त्यांनी नविन जबाबदारी मी परिपूर्ण सामर्थ्य पणाला लावून शंभर टक्के निभावेल असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखविला आहे.

त्यांच्या निवड बदल रावेर तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक केले आहे,व त्यांना सर्वांनी पुढिल वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. यात राष्ट्रीय अध्यक्ष, सचिव प्रदेश अध्यक्ष विक्की राजपूत, उत्तर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मनोहर चौधरी, प्रदेश अध्यक्ष अँड सतीश ताके , सविता कुमावत, सुरेश उप्पर, अर्जुन चव्हाण, राजेंद्र बोरकर, अरविंद माने, प्रदीप पाटील, कुष्णा कांडेलकर, जळगाव जिल्हा अध्यक्ष
अँड देवकांत पाटील, यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी यांनी कौतुक केले.