विकासचे दूध आजपासून इतक्या रुपयांनी महागले; असे आहेत नवे दर

डिसेंबर 9, 2025 8:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२५ । जळगाव दूध संघाने विकास ब्रँडने विक्री केल्या जाणाऱ्या दुधाचे दर प्रति लिटर दोन रूपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विकासचे गोल्ड दूध आता ७४ आणि स्मार्ट दूध ५६ रूपये प्रति लिटर झाले आहेत. हे दर आज ९ डिसेंबरपासून लागू झाले आहे.

vikas

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाकडे सद्यःस्थितीत गायीचे एक लाख ४६ हजार लिटर तसेच म्हशीच्या एक लाख लिटर दुधाचा पुरवठा होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध कारणांनी पुरवठा घटल्याने संघाच्या दैनंदिन दूध संकलनात ३५ ते ४० हजार लिटरची घट झाली आहे. स्पर्धात्मक खरेदीदरामुळे जिल्ह्यातून दररोज हजारो लिटर दूध गुजरात राज्यात रवाना होत आहे. स्थानिक खासगी डेअरींकडूनही जळगाव दूध संघापेक्षा जास्तीचे दर तसेच आगाऊ रक्कम देऊन दुधाची खरेदी वाढवण्यात आली आहे. त्याचा मोठा फटका जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला बसला आहे.

दूध संघातर्फे सुमारे तीन वर्षांपूर्वी दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली होती. काही दिवसांनी एक रुपयांची दरवाढ मागे घेतली होती.पूरपरिस्थितीमुळे यंदा चारा उपलब्ध नसल्याने दूध संकलनात घट झालेली आहे. त्यामुळे दूध दरात वाढ झाली. दरम्यान, आठ दिवसात तुपाच्या दरातही वाढ होणार असल्याचे संकेता दूध संघाने दिले आहेत.

असे आहेत नवे दर
दुधाचा प्रकार.. लिटरचे दर
गायीचे दूध – ५६ रुपये
म्हशीचे दूध – ६० रुपये
गोल्ड दूध – ७४ रुपये

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now