जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा परिषदचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा मुक्ताईनगर तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांना नुकतेच ‘स्मार्ट एज्युकेशन ऑफिसर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात हा गौरव समारंभ पार पडला.

जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा मुक्ताईनगर तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल ‘स्मार्ट एज्युकेशन ऑफिसर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज हे होते. यावेळी प्राचार्य मधुकर लक्ष्मण नानकर, पुणे येथील रानमळा पॅटर्नचे प्रणेते पोपटराव तुकाराम शिंदे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मांडे, महेश फालक, नाना पाटील आदी उपस्थित होते. शैक्षिक आगाज भारत या संस्थेमार्फत आयोजित या सन्मान सोहळ्याला राज्यभरातून अधिकारी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.