⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | गुन्हे | कारच्या धडकेत महिला फुटबॉलसारखी उडाली ; जळगावातील ‘हिट अँड रन’चा Video व्हायरल

कारच्या धडकेत महिला फुटबॉलसारखी उडाली ; जळगावातील ‘हिट अँड रन’चा Video व्हायरल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘हिट अँड रन’ सारखी घटना समोर आली असून यात भरधाव कारने महिलेला धडक दिल्यानंतर ही महिला फुटबॉलसारखी उंच उडाली आणि जागेवर आपटली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्या असून महिलेला ठोकर मारल्यानंतर मात्र कार सुसाट वेगाने पुढे निघून गेली अन् पलटी झाली. या अपघातातील CCTV फुटेज समोर आले असून अंगाचा थरकाप उडेल असा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

ही घटना जळगाव तालुक्यातील वावडदा नजीक घडली. यात कार वावडदाच्या दिशेने भरधाव येत होती. वावडदा चौफुलीवर सुमनबाई भिका राजपूत ही महिला डोक्यावर भांडं घेऊन रस्ता ओलांडत होत्या. रस्ता पूर्ण खाली होता. एक दोन जण रस्त्यावरून वावरत होते. तितक्यात एक बाईक आली. ही महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने एक कार समोरून आली.

ही कार अनियंत्रित झाली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमनबाईंना या कारने जोराची धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की सुमनबाई फुटबॉल सारख्या उडाल्या आणि खाली कोसळल्या. या भीषण अपघातात सुमनबाई गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ही कार एवढ्यावरच थांबली नाही. कारने एका दुचाकी स्वाराला धडक दिली अन् पुढे जाऊन उलटली. यात कारमधील तिघे आणि इतर दोनजण असे पाचहीजण जखमी झाले आहेत. या सर्वांवर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजसमोर आला आहे.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.