जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२४ । नागालैंड येथील महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो यांना जिल्हा प्रशिक्षणासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्यात पदस्थापना करण्यात आली आहे.

त्यांनी आयएएस परीक्षेत ३८७ रैंक मिळवलेली आहे. सन २०२३ च्या तुकडीतील परिविक्षाधीन भारतीय प्रशासन सेवेतील केझो यांच्यासह बारा अधिकाऱ्यांचे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसूरी येथे पहिल्या टप्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सहायक जिल्हाधिकारी म्हणून पदस्थापना देण्यात आला आहे. त्यांना ३० जुलै २०२५ पर्यंत दोन वर्षे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी संवर्गात पद निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे