⁠ 
रविवार, मे 19, 2024

२३७ शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । राज्यभरात टीईटी परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी झालेल्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात जिल्ह्यातील २३७ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताडणी केली जाणार आहे. याबाबत शिक्षण विभागाला आदेश प्राप्त झाले आहेत.

शासनाने राज्यात सन २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तपासणीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून संबधित शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राथमिकचे १५७ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुणे परीक्षा परिषदेकडे पाठवण्यात आले आहे. माध्यमिक विभागाच्या ८० शिक्षकांचे प्रमाणपत्र आज सादर केले जाणार आहे.
ज्या शाळेत १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत शिक्षक रूजू झाले आहेत. त्या शिक्षकांना टीईटीचे मूळ प्रमाणपत्र व वैयक्तिक मान्यता आदेशाची छायांकित प्रत कार्यालयास सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी विकास पाटील व माध्यमिकच्या कल्पना चव्हाण यांनी दिले होते.

ज्या शिक्षकांनी प्रमाणपत्र व वैयक्तिक मान्यतेची कागदपत्रे छाननीसाठी सादर केली नाही व हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित केली जाणार असल्याचे आदेशात म्हटले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षकांनी सादर केलेले १५७ प्रमाणपत्र पुणे येथे सादर करण्यात आले असून माध्यमिकच्या ८० शिक्षकांचे प्रमाणपत्र उद्या सादर केले जाणार आहे.

हे देखील वाचा :