⁠ 
सोमवार, जानेवारी 13, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव पोलीस ॲक्शन मोडमध्ये ; शहरातील चौकाचौकात वाहनांची कसून चौकशी

जळगाव पोलीस ॲक्शन मोडमध्ये ; शहरातील चौकाचौकात वाहनांची कसून चौकशी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । जळगाव शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून या पार्श्वभूमीवर आज शनिवारी सकाळी  ६ वाजता अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या उपस्थितीत सहा पोलीस पथक रस्त्यावर उतरले असून शहरातील मुख्य चौकाचौकात वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.

शहरात गत अनेक दिवसापासून मोठया प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. घरा समोर लावलेले वाहने चोरीला जात आहेत. तसेच विविध ठिकाणी पार्किंग केलेले वाहने दिवसा ढवळ्या चोरीस जात असल्याच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. यासंदर्भात शहरातील पाच पोलीस ठाण्यात अनेक गुन्हा दाखल झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांच्या आदेशान्वये आज शनिवार सकाळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी प्रभागाती प्रत्येक भागात जावून चौकात प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली आहे. यात वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर वाहन सोडले जात होते. तर कागदपत्रे नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक मुंढे यांनी दिले आहे.

या भागात केली कारवाई

शहरातील कांचन नगर, तांबापूरा, गेंदालाल मिली, पिंप्राळा हुडको, शिवाजीनगर हुडको, शनीपेठ परिसर, मास्टर कॉलनी,  सुप्रिम कॉलनी यासह आदी भागात ही कारवाई केली आहे. सकाळी ६ वाजेपासून नेमलेल्या ६ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद भागात जावून वाहनांच तपासणी केली. आज सकाळी ६ पथक तयार आहे, यात १० अधिकारी असून १२५ कर्मचारी याचा समावेश आहे, प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात असून संशयास्पद वाहनाधारकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.