⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | राजमाता जिजाऊचं वसुंधरा लांडगे करतायेत 12 वर्षापासून पारायण

राजमाता जिजाऊचं वसुंधरा लांडगे करतायेत 12 वर्षापासून पारायण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या आदर्श शिक्षिका वसुंधरा दशरथ लांडगे 2009 पासून जिजाऊचे पारायण करीत आहेत. यावर्षी 12 वर्षे पूर्ण झाली जिजाऊना शिवश्री मदन पाटील लिखित ग्रंथ वाचत असतांना प्रत्येक प्रसंगाच्या माध्यमातून त्यांना खूप ऊर्जा मिळते. राजमाता जिजाऊ यांचे कार्य तमाम महिला वर्गांना प्रेरणादायी आहे. जिजाऊंचे विचार महीलांनी आपल्या मुलांना द्यावे हा संदेश त्यांनी जिजाऊ जयंती निमित्ताने दिला.

जिजाऊ जयंतीच्या दिवशी पारायणाची सांगता झाली. यावेळी मराठा सेवा संघाचे मनोहरनाना पाटील, प्राध्यापक लीलाधर पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, सूर्यकांत पाटील, विश्वास आबा, कैलास पाटील, विजय पाटील, डीएम पाटील, पत्रकार ईश्वर महाजन, वानखेडे भाऊसाहेब, सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे, ईश्वर देशमुख, तेजस्विनी पाटील, मनीषा पाटील, वानखेडेताई, गुलाबराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते धनुभाऊ महाजन, नगरसेविका ज्योती ताई महाजन आणि असंख्य जिजाऊ प्रेमींनी पारायणाला भेट दिली. यावेळी वसुंधराताई लांडगे व दशरथ लांडगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह