---Advertisement---
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये प्रजाकसत्ता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२५ । ७६ व्या प्रजाकसत्ता दिनानिमीत्त (Republic Day) गोदावरी संस्थेच्या विविध संस्थामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

indian flag jpg webp

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात सकाळी ७ वा ३० मि. संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, संदस्य डॉ. केतकीताई पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,वैदयकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत,रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, होमीओपॅथी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी.बी पाटील, प्रिन्सीपल डॉ.आर के मिश्रा, फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.विशाखा गणविर, डॉ.केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा. शिवानंद बिरादर, नर्सिंग अधिक्षक संकेत पाटील यांच्या उपस्थीतीत संचालक डॉ. अनिकेत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे.

---Advertisement---

यानंतर विदयार्थ्यांचे मनोगत,भक्तीगिते,नृत्य कला सादर करण्यात येणार आहे. याचबरोबर डॉ उल्हास पाटील कृषि महा,कृषि अभियांत्रिकी, अन्न व तंत्रज्ञान,गोदावरी आय एम आर, डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज अँन्ड कॉम्युटर अ‍ॅप्लीकेशन, फॅशन महाविद्यालय, विधी व विज्ञान महाविद्यालय, गोदावरी सीबीएसई स्कुल, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय,डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल भुसावळ व सावदा या सह सर्व संस्थामध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम सादर होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थीत राहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---