⁠ 
सोमवार, मे 6, 2024

एरंडोलात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून जागतिक महिला दिन कार्यक्रम होवू शकले नाही. परंतू यंदा कोरोना नसल्यामुळे जागतिक महिला दिन एरंडोलला विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे.

दि. ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता पद्मालय फाटा ५ कि.मी. अंतराची मॅरेथान स्पर्धा होणार असून यासाठी फक्त विवाहीत महिलांसाठी २ गटात आयोजन केले आहे. पहिला गट – वय वर्षे २० ते ४० पर्यंत तर दुसरा गट – ४० वर्षांपुढील सर्व महिला. पांढरा ड्रेस, शर्ट किंवा साडी, पांढरी कॅप तसेच मॅरेथॉन स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. दोन गटातून प्रथम, द्वितीय, तृतिय येणार्‍यांना आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख बक्षिस देण्यात येणार आहे.

  • नांव नोंदणीसाठी संपर्क – क्षमा साळी मो. 8329564118, शकुंतला अहिरराव मो. 7588406744 अंजुषा विसपुते मो. 9850096572 बक्षिस वितरण दि. १२ मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी होईल.
  • दि. १२ मार्च रोजी कासोदा रोड, चौधरी हॉल याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. असून दुपारी १२ वाजेपासून कार्यक्रमांना सुरूवात होणार यात नृत्य, भारूड, कव्वाली, एकांकिका, समुहगीत तसेच नाटीकांसाठी विषय-स्वच्छता अभियान, पर्यावरण , कोरोना काल आणि आज, स्त्री शिक्षण, विवाह समस्या, ऑनलाईन शिक्षण-फायदे तोटे, शिक्षण-इंग्रजी माध्यम घ्यावेत.
  • कोरोनाचे निर्बंध शिथील झाले अथवा कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचे नियम पाळणे सर्वांसाठी बंधनकारक राहतील. यासाठी महिला मंडळ अध्यक्षा जबाबदार राहतील तसेच कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून महिलांनी वेळेवर आवश्यक त्या साहित्यासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम अथवा नाटीका सादर करण्यासाठी प्रत्येक महिला मंडळाला फक्त १० मिनीटांचा वेळ देण्यात येणार आहे याची नोंद घेवून कार्यक्रम उत्साह, आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यासाठी महिला मंडळ अध्यक्षा, पदाधिकारींनी सहकार्य करण्याचे आवाहन आयोजक शोभा साळी, डॉ. उज्वला राठी यांनी केले आहे.