गुन्हेभुसावळ

वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेची पाईपलाईन लंपास!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । ओझरखेडा धरण ते दीपनगर केंद्रादरम्यानची वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेची तब्बल 11 लाख 66 हजार 131 रुपये किंमतीची पाईप लाईन चोरट्यांनी लांबवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सन 2010 पासून या योजनेचे काम सुरू असून अद्याप साडेचार किलोमीटर लांब अंतराची पाईप लाईन अंथरणे बाकी असतानाच चोरट्यांनी चक्क पाईप लाईन लांबवल्याने खळबळ उडाली आहे.

तळवेल उपसा सिंचन बांधकाम विभागाचे शाखा अभियंता तुषार रामचंद्र राजपूत (28, खोटेनगर, जळगाव) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पिंप्रीसेकम शिवारातील गावठाण जमिनीवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकिची ओझरखेडा धरण ते दीपनगर केंद्रादरम्यानची 863 मेट्रीक टन वजनाची व 11 लाख 66 हजार 131 रुपये किंमतीची पाईप लाईन चोरट्यांनी 15 जुलै ते 20 ऑगस्टच्या दरम्यान केव्हातरी लांबवली.

ही बाब उघडकीस आल्यानंतर भुसावळ तालुका पोलिसात मंगळवारी तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली. तपास निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहेत.

Related Articles

Back to top button