⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | भुसावळकरांनो लस घ्यायला जाताय? ‘या’ दहा केंद्रांवर आज लसीकरण

भुसावळकरांनो लस घ्यायला जाताय? ‘या’ दहा केंद्रांवर आज लसीकरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ शहरात आज सोमवारी (दि.१८) दहा केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यासाठी १८५० डोस कोविशिल्ड तर ७०० कोव्हॅक्सीन लसी उपलब्ध आहेत. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी कोविशिल्डचा पहिला व दुसरा, तर कोव्हॅक्सीनचा केवळ दुसरा डोस दिला जाणार आहे. वरणगाव रोड आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे २०० डोस असून पहिल्या व दुसऱ्यासाठी प्रत्येकी १०० डोस वापरले जातील.

बद्री प्लॉट दवाखाना, खडकारोड, पालिका मुख्य दवाखाना, महात्मा फुले नगर आरेाग्य केंद्र येथे कोविशिल्डचे प्रत्येकी २०० तर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध आहेत. मॉडर्नरोडवरील अग्रेसन भवन आणि राम मंदिर वॉर्डातील ओसवाल पंचायती वाड्यात कोविशिल्डचे १५० डोस उपलब्ध आहेत.

यातून पहिल्या डोससाठी १०० तर दुसऱ्यासाठी ५० डोस वापरले जातील. नवशक्ती लसीकरण केंद्र, जामनेर रोड पालिका आणि रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेल्या केंद्रावर २०० कोविशिल्ड तर १०० कोव्हॅक्सीन आहेत. अहिल्यादेवी कन्या शाळा, ब्राह्मण संघ, येथे कोविशिल्डचे १५० तर कोवॅक्सीनचे १००, आदर्श हायस्कूलमध्ये कोविशिल्डचे २०० तर कोव्हॅक्सीनचे १०० डोस उपलब्ध असतील, लाभ घ्यावा.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.