⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | बातम्या | जळगाव शहरात लसीकरण केंद्रे वाढवावी : उपमहापौर

जळगाव शहरात लसीकरण केंद्रे वाढवावी : उपमहापौर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । जळगाव शहरात कोविड लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे . अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसून येत असल्याने त्या गर्दीला नियंत्रण करण्यासाठी व लसीकरण सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी जळगाव शहरातील लसीकरणाच्या केंद्रात वाढ करण्यासंदर्भात आज उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Covid-19 लसी आणि लसीकरण केंद्रांची संख्या अपूर्ण पडत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे तातडीने उपाययोजना करून लसीकरण कार्यक्रमात सुसूत्रता आणण्याची मागणी उपमहापौरांनी जिल्हाधिकाऱ्यां ना केली आहे त्याचबरोबर काही उपाय देखील सुचविले आहे.

ते खालील प्रमाणे:-

1. जळगाव शहरात व्हॅक्सिनेशन सेंटर्समध्ये वाढ करण्यात यावी.

2. व्हॅक्सिनेशन सेंटर वर येणाऱ्या नागरिकांच्या अँटीजन टेस्ट करणे उचित होईल.

3. पंचे चाळीस वर्षांवरील आणि 18 ते 44 वर्षांच्या वयाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे नेमण्यात यावी.

4. पहिला आणि दुसरा डोस देण्यासाठी स्वतंत्र केंद्रे नेमण्यात यावी.

5. लसीकरण केंद्रावर नागरिकांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागत आहे त्याकरिता त्या ठिकाणी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी सावली उन्हापासून सुरक्षा स्वच्छतागृहाची जागा आणि बैठक व्यवस्था खुर्ची इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असाव्या.

6. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी तसेच सामाजिक अंतर इत्यादी नियमांचे पालन नागरिकांकडून करून घेण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली पाहिजे.

7. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना उन्हामुळे उष्माघात आधी त्रास उद्भवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक लसीकरण केंद्रावर एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली पाहिजे.

हे उपाय उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सुचविले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.