⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद तडवी यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार

उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद तडवी यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । कोरपावली येथील उर्दू शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले मारुळ येथील रहिवासी जावेद तडवी यांनी गावातील वडिलांचे निधन झालेल्या व आईही कायम आजारी राहत असलेल्या जुमा लतीफ तडवी याच स्वखर्चने मोहरद येथील इब्राहीम सुभान तडवी यांची कन्या रुकसानाबी हिच्याशी दि.13 रोजी मोठ्या थाटात मुलगी बघण्यापासून ते वर वधूचे दागिने, कपडे, जेवण, वर्हाडीसाठी गाड्या असा लग्नकार्यात लागणार खर्च आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून एक आदर्श निर्माण केला. या कार्याची दखल घेत येथील गावकरी व तडवी पंच कमिटीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, देशदूतचे तालुका प्रतिनिधी अरुण पाटील, समाजसेवक मुक्तार पटेल, मुनाफ तडवी, ग्राप सदस्य आयोजक, सिकंदर तडवी, सत्तार तडवी, आरिफ तडवी, अफरोज पटेल, पत्रकार फिरोज तडवी, मराठी शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोळी, जाकीर शाह, निवृत्ती भिरुड, मरदान तडवी, ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी उपस्थित होते. यावेळी गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्या सहकार्याने स्वखर्चने सोडवल्या बद्दल व गावातील पथदिवे, गटार सफाई अशा आरोग्यमय कार्यकेल्याबद्दल उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल यांचे चिरंजीव समाजसेवक मुक्तार पटेल स्वखर्चने अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, इतर शैक्षणिक कामानिमित्त लागणारे दाखले काढून दिल्याबद्दल मुख्यध्यापक धनराज कोळी, पत्रकार फिरोज तडवी, जिल्हाध्यक्ष जलील पटेल, सरपंच विलास अडकमोल गौरव करण्यात आला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह