जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2024 ची अधिसूचना जारी झालीय. पदवीधरांना ही मोठी संधी आहे. याद्वारे लष्कर, नौदल आणि हवाई दलात ४५९ अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. यासाठी UPSC वेबसाइट /upsc.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2024 आहे. UPSC CDS Bharti 2024
पदाचे नाव
1) भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE) 100
2) भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 32
3) हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Course 32
4) ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT) 276
5) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Course 19
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर.
पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3: पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.4: पदवीधर.
पद क्र.5: पदवीधर.
वय मर्यादा : उमेदवारांचे वय 20 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्ज फी : अर्ज शुल्क 200 रुपये आहे. तथापि, SC/ST श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
अर्ज कसा करायचा
या भरतीसाठी तुम्हाला UPSC वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. अर्ज भरण्यापूर्वी वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) करावे लागेल.
1: अधिकृत वेबसाइट http://upsconline.nic.in ला भेट द्या
2: मुख्यपृष्ठावरील UPSC CDS 2 भर्ती 2024 लिंकवर क्लिक करा.
3: अर्जातील माहिती भरा.
4: अर्ज सबमिट करा.
5: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6: भविष्यातील संदर्भासाठी सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंटआउट ठेवा.