⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | UPI यूजर्सना मोठा धक्का ; 1 एप्रिलपासून पेमेंटवर अतिरिक्त शुल्क भरावे लागेल

UPI यूजर्सना मोठा धक्का ; 1 एप्रिलपासून पेमेंटवर अतिरिक्त शुल्क भरावे लागेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२३ । सध्याच्या घडीला UPI म्हणजेच ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’मुळे अनेक व्यवहार सोपे झाले आहे. देशात UPI व्यवहार करणारा वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहेत. जर तुम्ही नियमितपणे UPI द्वारे पैशांचे व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे १ एप्रिलपासून UPI यूजर्सना मोठा धक्का बसणार आहे.

होय, १ एप्रिल २०२३ पासून UPI ​​व्यवहार महाग होणार आहेत. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंटशी संबंधित एक परिपत्रक नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जारी केले आहे. यामध्ये १ एप्रिलपासून यूपीआयद्वारे व्यापारी व्यवहारांवर ‘प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय)’ शुल्क लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या बदलाचा परिणाम करोडो लोकांना होणार आहे.

1.1 टक्के अधिभार लावणार?
NPCI ने जारी केलेल्या परिपत्रकात 1 एप्रिलपासून 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के अधिभार लावण्याची सूचना केली आहे. हे शुल्क व्यापाऱ्यांच्या व्यवहाराला म्हणजेच व्यापाऱ्यांना पैसे देणाऱ्या ग्राहकांना द्यावे लागेल. वॉलेट किंवा कार्डद्वारे केलेले व्यवहार पीपीआयमध्ये येतात. इंटरचेंज फी सहसा कार्ड पेमेंटशी संबंधित असते. व्यवहार स्वीकारण्यासाठी आणि खर्च कव्हर करण्यासाठी शुल्क आकारले जाते.

डिजिटल पद्धतीने पेमेंट करणे महाग होणार आहे
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI) कडून असे सांगण्यात आले की 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्याचे पुनरावलोकन केले जाईल. NPCI च्या परिपत्रकानुसार, 1 एप्रिलपासून, Google Pay, Phone Pay आणि Paytm सारख्या डिजिटल मोडद्वारे पेमेंट करणे महाग होईल. जर तुम्ही 2,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे भरले तर तुम्हाला त्याऐवजी जास्त पैसे द्यावे लागतील.

आम्ही तुम्हाला सांगतो की एका अहवालात असे समोर आले आहे की UPI व्यवहारांपैकी 70 टक्के व्यवहार 2,000 रुपयांपेक्षा जास्त आहेत. NPCI च्या परिपत्रकात असे म्हटले आहे की 1 एप्रिलपासून नियम लागू झाल्यानंतर 30 सप्टेंबर 2023 पूर्वी त्याचे पुनरावलोकन केले जाईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.