⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

उद्यापासून दोन दिवस उत्तर महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट, शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या…

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२३ । शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात उद्या साेमवारपासून पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महारा‌ष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, ४ मार्चपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे काही भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबत अवकाळीमुळे राज्यात ढगाळ वातावरण झाल्याने तापमानाचा पारा काहीसा घसरला होता.

मात्र दोन चार दिवसापासून राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा वाढलेला दिसून आला आहे. समुद्र किनारपट्टीवर वाढत्या‎ तापमानात आर्द्रतेमुळे उकाडा असह्य‎ झाल्याने मुंबई ते केरळपर्यंत उष्णतेची‎ लाट निर्माण झाली आहे. दुसरीकडे‎ उर्वरित महाराष्ट्रात साेमवारपासून‎ अवकाळी पावसाचे सावट असल्याने‎ काहीशा ढगाळ वातावरणात कमाल‎ आणि किमान तापमानात घट झालेली‎ आहे.

भारत माैसम विभागाने‎ राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट‎ १८ मार्चपर्यंत लांबणार असल्याचा‎ अंदाज शनिवारी वर्तवला आहे.‎ जळगावसह उत्तर महाराष्ट्रात १३ व १४‎ मार्च असे दाेन दिवस अवकाळी पाऊस‎ हाेण्याची शक्यता असल्याने गहू,‎ हरभरा, मक्याचे नुकसान हाेऊ शकते.‎