जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा

एप्रिल 14, 2021 9:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. यातच हवामान खात्याने देखील अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. शहरास जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावरील अनेकांची तारांबळ उडाली होती.

rain

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा देखील वाढला होता. यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. थोड्या वेळेसाठी आलेल्या पावसामुळे हा उकाडा अजून वाढला आहे. विजांच्या कडकडाटास पाऊस आल्यानंतर अनेक भागातील वीज पुरवढा देखील खंडित झाला होता.

Advertisements

या अवकाळी पावसामुळे काही भागात शेतीमालाचे नुकसान झाल्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे. आधीच कोरोना त्यात या अवकाळी पावसाच्या सावटामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती देखील व्यक्त होत आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now