जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२५ । धरणगाव व एरंडोल तालुक्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदांची निवड बुधवार (दि. १ ) बिनविरोध पार पडली. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रेमराज पाटील यांची सभापतीपदी म्हणून बिनविरोध निवड झाली तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी अजित दादा गटाचे सुदाम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

धरणगाव व एरंडोल तालुक्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती यांनी राजीनामे दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली होती. निवडणूक बिनविरोध झाल्याने महायुतीला (शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस) मोठा फायदा झाल्याचे मानले जात आहे. .

याप्रसंगी उपस्थित मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्व सभापती संचालक मंडळ उपसभापती यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करावे व मार्केट कमिटी कशी प्रगती प्रथावर येईल उत्पन्न कसे वाढेल व थकबाकी कशी वसूल होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. चांगल्या कामासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलसह महायुतीचे सर्व पदाधिकारी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील, एमडी गाडी मार्केट कमिटीचे सचिव नवनाथ तायडे यांनी काम पाहिले.











