⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | संतापजनक ! जळगावच्या अल्पवयीन मुलासोबत आधी अनैसर्गिक कृत्य, नंतर..

संतापजनक ! जळगावच्या अल्पवयीन मुलासोबत आधी अनैसर्गिक कृत्य, नंतर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२४ । एकीकडे अल्पवयीन मुलींसह महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस घडत असून यातच जळगावात अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे तर त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ३० हजारांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चौघा संशयितांविरुद्ध पोक्सो व खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती डीवायएसपी संदीप गावित यांनी गुरुवारी दिली.

शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाची काही महिन्यांपूर्वी स्विमिंग शिकत असताना संशयितांसोबत ओळख झाली होती. त्यानंतर दि. १७ रोजी संशयितांनी पीडित मुलाला खान्देश कॉम्प्लेक्स परिसरात नेत त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याचा व्हिडीओ बनवला. संशयितांनी पीडित मुलाकडे ३० हजारांच्या खंडणीची मागणी केली.

मुलाकडून क्यूआर कोडद्वारे दोन वेळा रक्कमही घेतली. परंतु तरीही संशयित आरोपींची मागणी वाढतच असल्याने पीडित मुलाने वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना अटक केली असून चौथा संशयित फरार असल्याचे डीवायएसपी संदीप गावित यांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.