मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

अनैसर्गिक अत्याचारांची मालिका सुरूच; अल्पवयीन मुलावर अनैसर्गिकपणे अत्याचार

जळगाव लाईव्ह न्यूज| २६ जुलै २०२३। पाचोरा तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलावर गावातीलच एका युवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ जुलै रोजी रात्री आठ वाजता पीडित मुलाचे आई-वडील शेतीची कामे आपण घरी आले असता मुलगा घरी नसल्याने शोध घेतला असता कळाले. गावातीलच गोलू (उर्फ) ज्ञानेश्वर दिनकर महाजन यांच्यासोबत असल्याचे कळाले. आई-वडील हे गोलू महाजन यांच्या घरी गेले व दरवाजा उघडण्यास सांगितले. तेव्हा त्याचा घराचा दरवाजा आतुन बंद असल्याचे लक्षात आले. पिडीत मुलाच्या परिवाराने महाजन याच्या घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता अनपेक्षित असे कृत्य त्यांच्या नजरेस पडले.

पिडीत अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या फिर्यादी वरुन पाचोरा पोलीस स्टेशन ला संशयित आरोपी गोलू उर्फ ज्ञानेश्वर दिनकर महाजन याच्या विरोधात पोस्को एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली असून पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोउपनिरीक्षक योगेश गनगे करीत आहेत.