जळगाव शेजारील जिल्ह्यात अज्ञात व्हायरसचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय आहे वाचा?

जानेवारी 8, 2025 11:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२५ । एकीकडे कोरोना (Covid 19) सारखी महामारी देणाऱ्या चीनमध्ये (Chin) पुन्हा एकदा नव्या HMPV व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली असून HMPV व्हायरसने भारताचे दार ठोठावले आहे. भारतासह महाराष्ट्रात(Maharashtra) देखील HMPV व्हायरसने रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच मात्र जळगाव (Jalgaon) शेजारील जिल्ह्यात अज्ञात व्हायरसने धुमाकूळ घातलाय.

takkal

बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) अज्ञात व्हायरसमुळे अवघ्या तीन दिवसांतच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेगावमधील (Shegaon) काही गावांत ही गंभीर समस्या जाणवत आहे, अचानक टक्कल पडत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. राज्य सरकारचे मात्र दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

शेगाव तालुक्यात केस गळतीमुळे नागरिक भयभीत झाले आहे. वेगळ्या व्हायरसची एन्ट्री झाली का? अशी भीती नागरिकांमध्ये आहे. तीन दिवसांतच टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अनेकांनी खासगी रूग्णालयाची वाट धरली आहे, मात्र अद्याप हे का होतेय, याचं कारण समजू शकले नाही.

लक्षणे काय ?
शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात या अज्ञात व्हायरसने थैमान घातले आहे. या विषाणूची कुटुंब ची कुटुंब बळी ठरत आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर हातात सरळ केस येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.एवढ्या भयंकर प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिन्न आहे, त्यामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत.

दरम्यान, शाम्पू वापरल्यामुळे असा प्रकार घडत असावा असे काही डॉक्टरांचे मत आहे. पण कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावांमध्ये उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now