⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | “हस्तलिखीतातून मराठी भाषेची अनोखी ओळख” स्कूल ऑफ पर्फोरमिंग आर्टस् उपक्रम!

“हस्तलिखीतातून मराठी भाषेची अनोखी ओळख”  स्कूल ऑफ पर्फोरमिंग आर्टस् उपक्रम!     

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जेष्ठ पत्रकार हेमंत अलोने (दै.देशदूत) यांच्या प्रमुख उपस्थितीत डिस्प्ले बॉक्सवर स्वाक्षरी करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी के.सी.ई. सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, शालेय सामन्वक चंद्रकांत भंडारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ए.आर.राणे, प्रा.देवेंद्र सोनार,प्रा.हेमंत पाटील, प्रा. पियुष बडगुजर, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ व प्रा.संदीप केदार उपस्थित होते.
          

“मला अभिमान आहे मराठीचा” “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” असे आपण सार्थपणे अभिमानेने बोलतो मात्र ते केवळ अभिमानाने सांगणे यावरच सीमित न राहता ते विद्यार्थांच्या मनावर बिंबवले जावे यासाठी मू.जे. महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ पर्फोरमिंग आर्टस् तर्फे  हस्तलिखित स्वरूपातील ६ दर्शनी डिस्प्ले बॉक्स तयार केले गेले आहेत. मराठी राजभाषा दिनाचे महत्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व कळावे यासाठी स्कूल ऑफ पर्फोरमिंग आर्टस्  तर्फे टायपोग्राफी यात ४ बाय ८ या आकारात ६ हस्तलिखित बॅनर असलेले मराठी भाषेचे महत्व सांगणारे ६ हस्त लिखित चोकोणी आकारातील डिस्प्ले बॉक्स  विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहेत.

यात  डिस्प्ले फलक स्वाक्षरी अभियान यावर आधारित आहेत. हे डिस्प्ले बॉक्स महाविद्यालायाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आले आहेत. कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मराठी भाषेची ओळख होत ती आवड जोपासली जावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागप्रमुख प्रा. मिलन भामरे यांनी दिली.या उपक्रमासाठी कुणाल जाधव, रिटा घुगे, ईशा भावसार, लक्षिता जैन, तुषार पाटील, राहुल पाटील आदि विद्यार्थांनी परिश्रम घेतले. यासाठी त्यांना  विभागप्रमुख प्रा. मिलन भामरे यांच्यासह प्रा. पियुष बडगुजर, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ, प्रा. दिगंबर शिरसाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह