⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : अर्थसंकल्पासाठी मोदी सरकारने बदलली ‘ही’ मोठी प्रथा

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : अर्थसंकल्पासाठी मोदी सरकारने बदलली ‘ही’ मोठी प्रथा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या पुढील आठवड्यात लोकसभेमध्ये अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करणार आहेत. कोरोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प डिजिटल असणार आहे. यावेळी अर्थसंकल्पाच्या प्रती छापण्यात आलेल्या नाहीत. असे असताना मोदी सरकारने आजवर चालत आलेली अर्थसंकल्पापूर्वीची मोठी प्रथा बंद केली आहे. कोरोना महामारीमुळे यावेळी हलवा सेरेमनी रद्द (Union Budget Halwa Ceremony Cancelled) करण्यात आली असून अधिकार्‍यांना मिठाई वाटण्यात आली.

कुणाशीही संपर्क साधता येत नाही

दरवेळी बजेटच्या आधी हलवा बनवत एकप्रकारचा उत्सव साजरा केला जातो. यानंतर अर्थसंकल्प तयार करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी हे मंत्रालयात एका प्रकारे कैद असतात. या काळात त्यांना बाहेर कुणाशीही संपर्क साधण्याची परवानगी नसते. लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यावर त्यांना बाहेर पडता येते. या कर्मचार्‍यांना बंद करण्याआधी हलवा सेरेमनी केली जाते. यंदा याऐवजी या अधिकार्‍यांना मिठाईचे वाटप करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : ‘या’ दहा प्रमुख घोषणा देऊ शकतील दिलासा

निर्मला सीतारामन यांनी बदलल्या परंपरा

निर्मला सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. निर्मला सीतारामन यांनी आधीच अर्थसंकल्पाशी संबंधित परंपरा बदलल्या आहेत. त्यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला, तेव्हापासूनच परंपरांमध्ये बदल सुरू झाला. स्वातंत्र्यापूर्वीपासून चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा चालत आली होती. त्याऐवजी निर्मला सीतारामन यांनी लाल कपड्यात गुंडाळलेल्या लेजरच्या रूपात अर्थसंकल्प सादर केला. पेपरलेस बजेट आणि हलवा समारंभ न करता सुरू होणारी तयारी हा देखील या बदलांच्या एक भाग आहे.

हे देखील वाचा :

author avatar
Tushar Bhambare