⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | दुर्दैवी : दुचाकीवरून पडताच महिलेला ट्रकने चिरडले

दुर्दैवी : दुचाकीवरून पडताच महिलेला ट्रकने चिरडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । अचानक बैलगाडी आडवी आल्याने दुचाकीवरून खाली पडलेल्या महिलेला ट्रकने चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २० रोजी सायंकाळी ७.३० वाजता जानवे येथे घडली.

अशोक श्रीराम चौधरी व त्यांच्या पत्नी कविता (रा.सुभाष चौक, अमळनेर) हे दुचाकीने (क्र.एम.एच.१९-ए.झेड.१८३६) मालेगाव येथे उत्तरकार्यासाठी गेले होते. सायंकाळी जानवे येथे त्यांच्या दुचाकीसमोर बैलगाडी आडवी आली. बैलगाडीचा धक्का लागल्याने दुचाकीसह दांपत्य रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी अमळनेरहून विटा भरलेला ट्रक (क्र.एम.एच.१९-झेड.३६१७) धुळ्याच्या दिशेने जात होता. कविता चौधरी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अशोक चौधरी यांचा पाय फ्रॅक्चर झाला.

हे देखील वाचा :


    author avatar
    टीम जळगाव लाईव्ह