जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । मुंबई -आग्रा महामार्गावरील शिरपूर नजीक असलेल्या सावळदे गावाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीवरील आईसह मुलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात रविवारी दुपारी घडला. राधा राला गुथरे (27) व मुलगा आदित्य अशी मृतांची नावे आहेत.
मध्य प्रदेशातील वरला तालुक्यातील कुंडिया येथील रहिवासी राला खुमाण गोथरे हे कुटुंबासह मालेगावजवळील उमराणा येथे मजुरीच्या कामासाठी आले होते. रविवारी दुचाकी (एम.पी.46 एम.एस.-9996) ने उमराणा येथून कुंडिया, ता.वरला येथे जात असताना मुंबई-आग्रा महामार्गावर सावळदे गावाच्या पुढे शिरपूरच्या दिशेने जाणार्या ट्रक (एम.पी.07 एच.बी.4652) ने दुचाकीला उडवल्याने आदित्य व राधा गुथरे यांचा मृत्यू झाला.
हा अपघात इतका भयंकर होता कि, आईचा व मुलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.