⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | दुर्दैवी : शेतात काम करताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

दुर्दैवी : शेतात काम करताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । अमळनेर‎ तालुक्यातील फापोरे येथील १८ वर्षीय तरुणाचा ‎शेतात काम करताना,‎ ‎विजेचा धक्का लागून मृत्यू ‎झाला. मंगळवारी दुपारी ‎ ‎ ‎ साडेबारा वाजता ही दुर्दैवी ‎घटना घडली.‎ ‎अमळनेर पोलिसांत अकस्मात‎ मृत्यूचीकरण्यात आली आहे.‎

राहुल‎ ‎ हिलाल मोरे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा ‎ युवक कन्हेरे येथील‎ रतिलाल लोटन पाटील यांच्या शेतात‎ कपाशीला खत लावण्याचे काम करत होता.‎ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खत‎ लावताना, शेतात लोंबकळलेल्या वीजतारेला‎ त्याचा स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा जोरदार‎ धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. सहकारी‎ मजुरांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले.‎

तीन बहिणींचा एकच भाऊ‎
मृत राहुल हा तीन बहिणींचा एकुलता एक‎ भाऊ होता. तो बी.ए.च्या द्वितीय वर्षात शिक्षण‎ घेत होता. वडिलांची परिस्थिती हालाखीची‎ असल्याने राहुल मजुरी करून कुटूंबाला‎ आर्थिक हातभार लावत होता. त्याच्या दोन‎ बहिणी विवाहित आहेत. तर आई, वडील व‎ एका बहिणीसोबत तो राहत होता.‎

author avatar
टीम जळगाव लाईव्ह